गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

Little Book of Leadership Powerpoint

Check out this SlideShare Presentation:

प्रसाद चोथवे चे पत्र

नमस्कार,
ज्या दिवशी दादांनी इमेल केला त्या दिवसापासूनच वाट पाहत होतो की किती लोक आहेत जे या गोष्टीवर कमीत कमी विचार तरी करतील...आणि अपेक्षित आकडा आला.....हरकत नाही.
खरं तर या गोष्टीचा विचार मी माझ्या बाजूने खूप आधीपासूनच सुरु केला होता, या बाबतीत मी दादांशी बोललो पण होतो, की सगळं सुरळीत सुरु आहे पण मला प्रश्न पडतोय की "या सगळ्यात मला काय करायचं?" "मला खरच यातून समाधान मिळतंय?" आसाच आणि यासारखे अजूनही बरेच प्रश्न तुम्हालाही पडतच असतील, पण आपण हे वयच असं असतं ज्यात असे प्रश्न पडतातच, असं म्हणून त्याची उत्तरं शोधत बसत नाही.... आज दादांनी विषय दिला आणि चर्चा तरी सुरु झाली, निदान आपल्याला आपलीच नव्याने ओळख होईल त्यातून.
"चाळीशीला नोकरीत बदल...कारणे काय?"
विषयच असा आहे की बोलायला खरच खूप आहे, मी परिपूर्ण प्रयत्न करेल विषयाला अनुसरूनच लिहिण्याचा, पण असा वाटलंच की मी विषयांतर केलं तर तेवढा भाग सोडून द्या.
याचा अभ्यास करण्यासाठी मी २ पिढ्या मागे जातोय(कारण २ च मी पाहिलेल्या आहेत)....... म्हणजे आपले आजोबा, त्यांची कारकीर्द आणि आपले वडील आणि त्यांचं आयुष्य... सहज विचार केलं तरी कळेल की आज ची आपली परिस्थिती आणि त्यांची परिस्थिती यात खूप फरक आहे, त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागला त्या गोष्टी आज आपण अगदी सहज करू शकतोय.
आपल्या आजोबांची पिढी म्हणजे स्वातंत्र्योत्तर पहिली पिढी. त्या पिढीने खरं स्वतंत्र जगायला सुरुवात केली, देश स्वतंत्र झाला आपलं सरकार आलं, आणि आपल्या लोकांना सरकार दरबारी नौकरी लागणे सुरु झाले, ज्याचं बऱ्यापैकी शिक्षण आहे अशांना नौकरी लागली. मग शिक्षणाचं महत्व त्यांना कळलं, जितकं चांगलं शिक्षण तितकी चांगली नौकरी.आपण तर आता नाही शिकू शकणार मग मुलांना चांगलं शिकाऊ हि भावना आली आणि मग मुलांना उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्याकडे त्यांचं कल सुरु झाला.आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या एक वेळ तरी चालेल पण मुलांना काही कमी नाही पडू द्यायचं म्हणून आटापिटा करणारी हि पिढी म्हणूनच सेवानिवृत्त झाली तरीही त्यांच्या कडे मुबलक असा पैसा नव्हताच. (आयुष्य स्थिर-स्थावर होण्याचं वय --- जवळ जवळ ५५-६०)
त्यांनी पाहिलेले सगळे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्या वडिलांची पिढी सज्ज झाली, हवं तितका शिक्षण असल्यामुळे नौकरी पण लागली पण ती कशी की घर व्यवस्थित चालेल अशी, त्यातून बचत करायचीच म्हनला तर काट-कसर करावीच लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण तर कराय्चीयेत पण सोबतच आपल्या मुलांनी काय करावा हे हि स्वप्नं आलीच, आपल्या मुलांनी आपल्या पेक्षा चांगल्या हुद्दयावर नौकरी करावी आसाच प्रत्येकाला वाटतं, पण मग त्यासाठी त्यांनाही तेच करावा लागलं.... उत्तम शिक्षण,त्यासाठी वाढलेल्या प्रचंड फीस आणि देणग्या पण सगळ्यांसोबत टिकायच असेल तर हे सारा करणं भाग आहे हे जाणून त्यांनीही आटापिटा सुरु केला.आपल्या इच्छा मारून मुलांना उभं केलं आणि ते करण्यातच निवृत्तीची वेळ जवळ आली........निवृत्त झाल्यास हातात पुढचा आयुष्य सुखात काढण्या इतपत पैसा, त्यात एखाद घर आणि एखादी गाडी (ते हि जर बाकी जबाबदार्या नसतील तर) बाकी काही नाही......(आयुष्य स्थिर-स्थावर होण्याचं वय --- जवळ जवळ ४५-५०)
आता आपली पिढी.... आपणही त्यांच्या पावलावर पाउल टाकतोय, फ़क़्त फरक इतकाच आहे की आपल्याला त्यांनी जितक्या खस्ता खाल्ल्या तितक्या नाही खाव्या लागणार, थोडक्यात काय तर हि वेळ येण्यासाठी २ पिढ्या राबल्यात आधीच. आज आपण २२ ते २३ व्या वर्षी शिक्षण संपवतो आणि लगेच त्यानुसार नौकरी पण लागते, थोड्या फार प्रमाणात कमी जास्त पगार पण सगळं व्यवस्थित भागतं आणि बचत पण होते, अर्थात आपल्या पिढीलाही पुढे प्रश्न आहेतच मुलांच्या शिक्षणाचे पण तितका त्रास नाहीये(यात वाद असू शकतो....पण मला वाटतं की जितके कष्ट त्यांना घ्यावे लागले तितके आपल्याला नाक्कीच् नाहीयेत)
(आयुष्य स्थिर-स्थावर होण्याचं वय --- जवळ जवळ २५-३०).
आजोबांच्या पिढीने स्वप्नं पाहायला सुरुवात केली, आजोबांच्या स्वप्नांना साकारण्यात आणि आपल्याला घडवण्यात आपल्या आईवडिलांचा जवळ जवळ सगळा काळ नौकरीतच गेला. आणि आपण आज आई-वडिलांचे स्वप्नं पूर्ण करून स्वतःबद्दल पण विचार करू शकतोय आणि ते हि ३०-४० या वयात.म्हणजे आज लोकांकडे स्वतःबद्दल विचार करायला वेळ आहे, कितीही पैसे कमावले तरी मला हेच करायचं का हा प्रश्न समोर येतो आणि हाच प्रश्न आपल्याला नवीन विचार देऊन जातो.
मला वाटत ४० शीत नौकरी बदल करण्यामागे किंवा क्षेत्र बदलण्यामागे हाच विचार असायला हवा, म्हणजे एखादा अगदीच ३० शीत पण हा विचार करेल की मला हे नाही करायचं, नौकरी नाही करायचीये स्वतःचा काहीतरी करायचं किंवा वेगळं क्षेत्र माझी वाट पहातय, पण त्या वयात असे बदल करणे म्हणजे खूप मोठा निर्णय असतो,क्षेत्र बदल करून तिथे उभे राही पर्यंत मुबलक पैसा हातात नसतो,आणि स्वतःचा उद्योग करण्यासाठी हवं तेवढा अनुभव नसतो...म्हणून ४० पर्यंत हे सगळा जवळ जवळ हातात येत.पैसा, अनुभव आणि वेळ, ज्यामुळे हा निर्णय बहुतेक लोक सहज घेऊ शकतात.
मुलांचं शिक्षण संपत आलेलं असतं किंवा संपलेलं असत, घर, गाडी सगळं जवळ असतं.मग करण्यासाठी आता काय आहे.....तेच तेच काम करण्या पेक्षा नवीन काही तरी करू म्हणून बदलणारे पण आहेत किंवा आता मला जे करायचं तेच मी करणार म्हणणारे पण आहेत.
असं करणं योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण आपल्या आधीच्या पिढीला हे मान्य होणार नाही कारण सगळं सुरळीत असताना असं अचानक सोडून दुसरा काहीतरी करता येतं हेच त्यांना माहित नाहीये किंवा मान्य नाहीये.
कामाच्या ठिकाणी होत असलेली घुसमट,किंवा अपमान,वेळी-अवेळी करावी लागणारी कामं,पर्सनल-प्रोफेशनल आयुष्याची सांगड ना घालता येणे, टेन्शन,हवं तसा काम पगार ना मिळणे, ऑफिस मधलं राजकारण हे हि करणं आहेत नौकरीत बदल करण्याची, पण त्यातही आपण बदल केलं तरी व्यवस्थित उभे राहू शकतो हा विश्वास असतोच की, आणि तो येतो कारण तितकी बचत असते जवळ.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या वरून मला एक नवीन विषय पण मिळाला जो आपल्याला विचार करायला लावेल.
मी वरती सांगितलेल्या ३ पिढ्यात
१ ली पिढी - पर्सनल आयुष्य जगा आणि वेळ मिळाला तर प्रोफेशनल बघू
२ री पिढी - पर्सनल आयुष्य जगा आणि सोबत प्रोफेशनल आयुष्य पण सांभाळा
३ री पिढी - प्रोफेशनल आयुष्यच सगळय, वेळ मिळाला तर पर्सनल चं बघू.
४ थी पिढी - ? फ़क़्त प्रोफेशनल?????????????
ट्रेंड म्हणजे काय? समाजातल्या आपल्याला माहित असलेल्या १० लोकांनी केलेली गोष्ट म्हणजे ट्रेंड! आपल्याच सोबतच्या/ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीने अमुक गोष्ट केली, आपणही करू म्हणजे ट्रेंड.....तो आसाच वाढतो...त्याचे बरे वाईट दोन्ही परिणाम आहेत. आपण नवीन ट्रेंड तयार करायचा की जो आहे त्याच्या मागे जायचं हे आपण आपलं ठरवावं.
जर शक्य झालंच तर आपली हि वैचारिक शृंखला अशीच चालू ठेऊ..........
दादांनी परवा पाठवलेला पोलीस स्टेशन चा सर्वे खूपच वाईट होता, धकाधकीच्या आयुष्यात तब्येतीचे १२ वाजलेत, कालच एक बातमी आली आमच्या कंपनीत एक मुलगा काम करत होता, १ वर्ष पूर्वी त्याने कंपनी सोडली. वय वर्ष २५ आणि Heart-Attack ने गेला.
प्रोफेशनल आयुष्यात पद, प्रतिष्ठा, पैसा यावर मिळणाऱ्या खोट्या आणि आभासी सुखाच्या मागे धावणे आणि त्यालाच "यशस्वी" असं संबोधणे हा पण एक नवीन ट्रेंड आहे ..... मग त्या ट्रेंड मागे जाणं चांगलं की आत्मिक समाधाणाने स्वतःला, तब्येतीला आणि जवळच्यांना सांभाळून जगणं चांगलं?
आपण काय करू शकतो ज्या मुळे आपल्याला हा ट्रेंड बदलता येईल आणि आपल्या पुढच्या पिढीला नवीन काही तरी देता येईल.... हा विषय घेऊन लिहिता येईल आपल्याला.
धन्यवाद.
प्रसाद चोथवे.
या गॅझेटमध्ये एक एरर होती.